घंटागाडीवाल्यांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:52 AM2018-10-20T01:52:09+5:302018-10-20T01:52:20+5:30
रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या घरातील कचरा संकलनाची जबाबदारी घंटागाडीवाल्यांवर सोपवण्यात आली. गल्लोगल्ली जाऊन घरातील कचरा संकलित करणे हे ...
रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या घरातील कचरा संकलनाची जबाबदारी घंटागाडीवाल्यांवर सोपवण्यात आली. गल्लोगल्ली जाऊन घरातील कचरा संकलित करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. मात्र अनेक घंटागाडीवाले कचऱ्याचे विघटन करण्यासाठी तासन्तास एखाद्या ठरावीक कचराकुंडीवर उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे घरोघरचा कचरा वेळेत न संकलित केल्याने कचरा घरातच कुजत आहे. त्यामुळे सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचºयामुळे घरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या शहरातील नागरिक अनेक साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. ताप, साधा ताप, तीव्र ताप, खोकला, सर्दी, डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू अशा आजारांचे सावट नागरिकांच्या डोक्यावर घोंगावत आहे. त्यामुळे सध्या नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये वावरत आहेत. यातच नागरिकांच्या घरातील रोज उचलला जाणारा कचरा दिवसेंदिवस न उचलल्याने घरामध्ये दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. घरोघरी फिरून कचरा उचलण्याची जबाबदारी ज्या घंटागाडीची असते ते घंटागाडीचालक एखाद्या कचराकुंडीवर घंटागाडी लावून तासन्तास त्या ठिकाणी कचऱयाचे विघटन करताना दिसून येत आहेत. उचललेल्या कचºयातील भंगार गोळा करण्याचे काम घंटागाडीवरील महिला करीत असल्याने नागरिकांच्या घरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरात कचरा साचत आहे. दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे.
सलग कचरा गोळा करण्याऐवजी दिवसाला दोन किंवा तीनच गाडी कचरा उचलत आहेत़ त्यामुळे अनेक कॉलन्यांमध्ये तीन ते चार दिवस घंटागाडी जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रोजच्या रोज घंटागाडी जात नसल्याने घरात साचलेला कचरा कुठे टाकावा हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे घंटागाडीच येत नसल्याने घरात जमलेला कचरा नागरिक नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे टाकीत आहेत़