कचरा पडेना, चॉकलेट मिळेना!, लोणावळा शहरात अस्वच्छता, मशिन पडल्या धूळ खात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 02:37 AM2017-09-14T02:37:36+5:302017-09-14T02:38:08+5:30

लोणावळा शहरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बसविलेल्या कचरा मशिनची अवस्था ‘ना कचरा पडेना ना चॉकलेट मिळेना’ अशी झाल्याने या मशिन धूळ खात पडल्या आहेत.

 Garbage was found, chocolate was found, there was no food in the city of Lonavla; | कचरा पडेना, चॉकलेट मिळेना!, लोणावळा शहरात अस्वच्छता, मशिन पडल्या धूळ खात  

कचरा पडेना, चॉकलेट मिळेना!, लोणावळा शहरात अस्वच्छता, मशिन पडल्या धूळ खात  

Next

लोणावळा : लोणावळा शहरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बसविलेल्या कचरा मशिनची अवस्था ‘ना कचरा पडेना ना चॉकलेट मिळेना’ अशी झाल्याने या मशिन धूळ खात पडल्या आहेत.
मागील चार वर्षांपासून शहरात स्वच्छता मोहिमेचा मोठा गाजावाजा झाला. मुलांच्या चित्रकला व भित्तिचित्र स्पर्धा, जनजागृती रॅली, शाळांमध्ये योग्य प्रकारे कचरा संकलन करणाºया मुलांना गुण देणे, स्वच्छतेची शपथ असे नानाविध प्रकार करत कागदोपत्री शहर एकदम स्वच्छ झाल्याने महाराष्ट्रातील पहिल्या सहा नगर परिषदांमध्ये लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले. वास्तव मात्र विपरीत आहे.
शहरात कचरा उचलण्यासाठी कोट्यवधीचा ठेका दिलेला असताना जागोजागी कचºयांचे ढीग साचले आहेत. कचराकुंड्या भरभरून वाहत आहेत. कचरा उचलणाºया निम्म्याहून अधिक गाड्या बंद पडलेल्या असल्याने शहरात सर्वत्र स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. मुलांना व नागरिकांना कचºयाबाबत शिस्त लागावी याकरिता मागील वर्षी शहरातील मावळा पुतळा चौक, रायवुड कॉर्नर, भांगरवाडी यासह काही शाळांच्या बाहेर एक आगळे वेगळे मशिन लावण्यात आले. या मशिनचे थाटामाटात उद्घाटन झाले.
या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कचरा टाकला की त्यामधून चॉकलेट बाहेर येणार हे होते. प्रत्यक्षात अनेक वेळा कचरा टाकला तरी चॉकलेट काही बाहेर न आल्याने शाळकरी मुलांनी या मशिनकडे काणाडोळा केला. त्यानंतर शाळांच्या बाहेरील मशिन इतरत्र हलविण्यात आली. सध्या या मशिन जागोजागी धूळ खात पडल्या आहेत. नगर परिषदेचे अधिकारी म्हणाले, की सदर मशिन ज्या संस्थेने बसवली त्यांनी मशिनकडे लक्ष न दिल्याने ही अवस्था झाली आहे.
दर वर्षी नगर परिषद कोटी रुपये केवळ शहराच्या स्वच्छतेसाठी खर्च करत असताना स्वच्छतेचा केवळ फार्स होत असल्याने कचºयांचे पैसे नेमके कोणाच्या खिशात जात आहेत, असा प्रश्न लोणावळेकर उपस्थित करु लागले आहेत. पर्यटननगरीचे पर्यावरण स्वच्छच राहायला हवे, त्यासाठी नगर परिषदेने विशेष काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कर्तव्यशून्यतेचा नारा देण्यात धन्यता
शहराच्या मध्यवर्ती भागात कच-याची समस्या भयानक आहे. बाजारभाग, भांगरवाडी, वर्धमान सोसायटी, गावठाण, मुख्य रस्ते, रुग्णालयांच्या समोरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात स्वच्छतेचे बारा वाजले असताना नगर परिषद मात्र ‘स्वच्छ लोणावळा व सुंदर लोणावळा’ हा कर्तव्यशून्य ठरलेला नारा देण्यात धन्यता मानत असल्याने नागरिक हैराण आहेत.

Web Title:  Garbage was found, chocolate was found, there was no food in the city of Lonavla;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे