गावठी कट्टे, परदेशी बनावटीची पिस्तुले येतात कोठून; पिंपरीत गुन्हेगारांना राहिला नाही धाक

By विश्वास मोरे | Published: May 25, 2023 05:52 PM2023-05-25T17:52:28+5:302023-05-25T17:53:03+5:30

दिवसाढवळ्या गोळीबाराची पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पंधरा दिवसात दुसरी घटना

Gavathi Katte, where do foreign made pistols come from; Criminals have no fear in Pimpri | गावठी कट्टे, परदेशी बनावटीची पिस्तुले येतात कोठून; पिंपरीत गुन्हेगारांना राहिला नाही धाक

गावठी कट्टे, परदेशी बनावटीची पिस्तुले येतात कोठून; पिंपरीत गुन्हेगारांना राहिला नाही धाक

googlenewsNext

पिंपरी : चिखलीत भरदिवसा तरूणावर गोळीबार करण्याची घटना नुकतीच दुपारी घडली. दिवसाढळ्या हल्ले आणि गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. त्यांना रोखण्यात पोलीसदलास अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पूर्ववैमनस्यांतून हल्ला करणे, किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटनांमध्येही पिस्तुले वापरण्यात येत आहेत. ही पिस्तुले येतात कोठून?  याचे मूळ शोधून त्यावर उपाय करण्यात अद्यापही पोलिसांना पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे कष्टकºयांची नगरी आता गुन्हेगारी कृत्यांमुळे कुप्रसिद्ध होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातून पिस्तुले येत असल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी आणि पिस्तुलांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाची निर्मिती झाल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे शहरवासीयांना वाटत होते. मात्र, गेल्या दीडवर्षांत गावठी कट्े आणि पिस्तुले आढळून येण्याच्या आठ घटना आयुक्तालय परिसरात घडल्या आहेत. तर मागील पंधरा दिवसांचा आढावा घेतल्यास तळेगाव दाभाडे येथे राजकीय नेते किशोर आवारे यांची पालिका भवनासमोर गोळ्या घालून तसेच कोयत्याने निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर चिखलीत सोन्या तापकीर या तरूणांवर गोळीबार करून खून करण्यात आला आहे.

या पोलिसठाण्यांमध्ये गुन्हे

मात्र, गेल्या दीडवर्षांत गावठी कट्े आणि पिस्तुले आढळून येण्याच्या आठ घटना आयुक्तालय परिसरात घडल्या आहेत.  त्यात चिंचवड, हिंजवडी, चाकण, चिखली, देहूरोड, आळंदी, तळेगाव दाभाडे या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पिस्तूल बाळगणारे आरोपी वारंवार आढळून आले आहेत. बेकायदा पिस्तूल बाळगणाºयांना एकदा पकडले जाते. बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल होतो. जामिनावर सुटल्यानंतर हे आरोपी पुन्हा शस्त्र खरेदी करतात. पिस्तूलविक्रीच्या या छुप्या बाजारपेठेची त्यांना चांगलीच माहिती असते. पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले, तरी ते आणखी पिस्तूल मिळवितात, हे मूळ पोलिसांनी शोधायला हवे.

कोणत्या घटनांमध्ये आढळली पिस्तुले
 
दहशत माजविण्यासाठ तलवारी नाचविण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच खून, धमकावणे आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणात राजरोसपणे पिस्तुलाचा वापर केला जात आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात आणि तसेच निर्जन ठिकाणी रस्त्यात अडवून लुटण्यासाठी पिस्तुलाचा किंवा खून आणि हल्ला करण्यासाठी पिस्तुले वापरली जातात. तसेच येथील जमीनीला सोन्याचा भाव आल्याने वाढदिवसाला हवेत गोळीबार करण्याच्या घटना उपनगरामध्ये घडलेल्या आहेत. याची नोंद पोलिसठाण्यातील गुन्हयांमध्ये नोंदविली गेली आहे.

उत्तर प्रदेशाशी पिस्तुलाचे कनेक्शन

पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या आणि स्थानिक पोलिसांच्या कारवाईत केली जाते.  पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे आढळून येत आहेत. परराज्यांतून गावठी कट्टे, पिस्तूल आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title: Gavathi Katte, where do foreign made pistols come from; Criminals have no fear in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.