महापालिकेला ८५१ कोटींचे उत्पन्न
By Admin | Published: November 24, 2015 12:56 AM2015-11-24T00:56:03+5:302015-11-24T00:56:03+5:30
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतरही चालू आर्थिक वर्षात महापालिकेला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान आणि ५०
पिंपरी : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतरही चालू आर्थिक वर्षात महापालिकेला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान आणि ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कंपन्या व व्यापाऱ्यांकडून वसूल होणारी एलबीटी यामुळे महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ८५१ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सुरुवातीला महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत जकातकर होता. मात्र, राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ पासून महापालिकेकडून आकारला जाणारा जकातकर बंद केला. त्यानंतर एलबीटी हा नवीन कर लागू केला. परंतु, एलबीटीला व्यापाऱ्यांचा मोठा विरोध झाला. तरीही एलबीटी सुरूच ठेवण्यात आला.
‘पेंटाव्हॅलंट’ लसीकरण
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बालकांना ‘पेंटाव्हॅलंट’ लस देण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. पाच रोग प्रतिबंधकांचा समावेश असलेली ही लस महापालिकेचे सर्व दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध होणार आहे. चव्हाण रुग्णालयात सोमवारी ‘पेंटाव्हॅलंट’ लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. शासनाकडून या लसीचे ३२ हजार ७५० डोस महापालिकेला पुरविण्यात आले आहेत. या लसीकरणाबाबत महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटीस-बी या लसींबरोबर हिमोफिलस इन्फ्ल्युएंझा टाइप-बी या आजाराच्या लसींचा समावेश आहे. लस बालकांना वर्षातून तीन वेळा म्हणजेच दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांच्या कालावधीत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)