शिक्षकांमुळे सुसंस्कारित पिढी - कृष्णराव भेगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:40 AM2018-10-01T00:40:51+5:302018-10-01T00:41:33+5:30
तळेगावमध्ये विवेकानंद पुरस्काराचे वितरण
तळेगाव दाभाडे : सुसंस्कारित विद्यार्थी आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी शिक्षकांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले. येथील श्री डोळसनाथमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाचे अधिकारी हरुण अत्तार, शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम, डॉ. प्रमोद बोराडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,संदीप भोसले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी संस्था राबवीत असलेले उपक्रम व कार्याचा आढावा घेतला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उºहे, शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, सचिव मिलिंद शेलार, बाळासाहेब शिंदे, सुदाम दाभाडे, रामराव जगदाळे, नगरसेवक अॅड.श्रीराम कुबेर, शबनम खान, जयश्री जोशी, सुतेचा बिचे, मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
पुरस्कारार्थींची नावे
जयश्री चेपे (पूर्वप्राथमिक विभाग), अर्चना शेरे (प्राथमिक विभाग), रेणू शर्मा (माध्यमिक विभाग), मावळ ग्रामीण भागात काम करणारे स्थानिक शिक्षक सहदेव डोंबे, तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निंबळे यांना मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीराम कुबेर यांचा सत्कार
संचालक अॅड.श्रीराम कुबेर यांची तळेगाव नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी हरुण अत्तार, प्रा. प्रदीप कदम, डॉ.प्रमोद बोराडे, डॉ. संभाजी मलघे, सहदेव डोंबे यांनी मनोगत व्यक्त केले. कुसुम वाळुंज आणि प्रा. दीपक बिचे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.