शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:09 AM2018-09-27T02:09:58+5:302018-09-27T02:11:06+5:30

शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही.

Girish Bapat news | शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

Next

पिंपरी - शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. शिक्षण हा पेशा आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी बापट बोलत होते. महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव
खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला
बाबर, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, उषा काळे, राजू बनसोडे, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, सुवर्णा बर्डे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होत्या.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘शिक्षक गुणवंत कसा ठरवायचा हा मोठा प्रश्नच आहे़ कारण प्रत्येक शिक्षक हा गुणवंतच असतो. गुरू हे श्रेष्ठच असतात. शिक्षक समाजाबरोबर राहतो. प्रत्येक घटकाला बरोबर घेतो. महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी महापालिका शाळेतून निर्माण व्हावेत. तसेच गुणवंत शिक्षकांची निवड करण्यासाठीच्या समितीत तज्ज्ञांची निवड करावी.’’
महापौर जाधव म्हणाले,‘‘पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. पालिकेच्या शाळेत या नगरीतील कष्टकऱ्यांची मुले शिकतात. पालिका शाळेतील मुलांचा माध्यमातून शहराचे नाव व्हावे.’’
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले.

भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती असून, त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. शिक्षकांमुळेच मी या
पदापर्यंत पोहोचलो. शिक्षक कधीच पुढारी झाला नाही. शिक्षकाने अनेक नेते घडविले. डॉक्टर, अभियंते, वकील निर्माण केले. शिक्षक विद्यार्थ्यांना आपली संपत्ती मानतात. शिक्षकांमुळेच आपणाला दिशा मिळते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. माणसाचे वेतनावर मूल्यमापन ठरत नाही. शिक्षणावर त्याचे मूल्यमापन ठरविले जाते. शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: Girish Bapat news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.