हिंजवडीतील समस्या लावणार मार्गी , शेतक-यांवर अन्याय होणार नाही - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:56 AM2017-09-16T02:56:21+5:302017-09-16T02:57:23+5:30
आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
हिंजवडी : आयटी पार्कच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून, सर्वच शासकीय संघटना यात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. विकासाच्या या मार्गात काही शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याकडेही सरकार जातीने लक्ष देणार आहे, असे मत पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
म्हाळुंगे, हिंजवडी, माण येथील बाधित शेतकºयांशी देखील बापट यांनी या वेळी चर्चा केली. पीएमआरडीएच्या माध्यमातून म्हाळुंगे येथे नव्याने टाऊनशिप उभारण्यात येत आहे. तसेच प्रस्तावित रस्त्यातही अनेक शेतकºयांच्या जमिनी विकासाच्या कामासाठी घेतल्या जाणार आहेत. जे शेतकरी जमिनी देणार आहेत, त्यांना वाढीव एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून मिळणारे लाभ देखील अधिक असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांमधील असुरक्षिततेची भावना कमी होत आहे. उर्वरित शेतकºयांशीदेखील बोलणी सुरू असून, त्यावर योग्य तोडगा काढण्यात येत आहे. महापालिका हद्दीपासून हिंजवडीपर्यंत असलेला रस्ता रुंदीकरण, सिग्नल बसवणे आदी मागण्याही त्यांनी मान्य केल्या.
पावसाळ्यानंतर रस्त्याच्या अडचणी कमी होतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. हिंजवडी ग्रामस्थांनी कचरा व्यवस्थापनासाठी २ एकर जागेची मागणी केली होती. हिंजवडी, मारुंजी, माण व एमआयडीसीतून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन यातून होणार होते. मात्र एमआयडीसी त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचे या वेळी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यावर यावर योग्य प्रकारे अंमलबजावणी करून निर्णय घ्यावा, असे बापट म्हणाले.