पालिकेच्या विरोधात न्यायालयात जाणार; सुविधा न देताच बांधकाम परवाने दिल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:48 AM2017-11-12T01:48:22+5:302017-11-12T01:48:33+5:30

पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे.

To go to court against the corporation; Complaint about the construction permit without having the facility | पालिकेच्या विरोधात न्यायालयात जाणार; सुविधा न देताच बांधकाम परवाने दिल्याची तक्रार

पालिकेच्या विरोधात न्यायालयात जाणार; सुविधा न देताच बांधकाम परवाने दिल्याची तक्रार

Next

रावेत : महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे, असे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भोंडवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे़ बंधाºयातून होणारी पाणी गळतीबाबत प्रशासनास वारंवार कल्पना देऊनसुद्धा दररोज होणाºया या पाणी गळतीकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही़
भोंडवे म्हणाले, ‘‘रावेत प्रभागात असणा-या पाणी, वीज, रस्ते व इतर असुविधांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर याना भेटून समस्या मांडल्या आहेत़ परंतु प्रशासन वेळकाढूपणा करीत वेळ मारून नेत आह़े. 

Web Title: To go to court against the corporation; Complaint about the construction permit without having the facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.