चिंचवडमध्ये चित्तराव गणपती मंदिराजवळ असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:39 IST2020-03-03T23:40:22+5:302020-03-04T15:39:54+5:30
चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात चित्तराव गणपती मंदिराजवळ असणाऱ्या गोडाऊनला रात्री अकरा वाजता अचानक भीषण आग लागली.

चिंचवडमध्ये चित्तराव गणपती मंदिराजवळ असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग
चिंचवड:चिंचवड गावातून काळेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर केशवनगर भागात चित्तराव गणपती मंदिराजवळ असणाऱ्या गोडाऊनला रात्री अकरा वाजता अचानक भिषण आग लागली.काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग पसरत गेली. या भागात अनेक अनधिकृत गोडावून व व्यावसायिकांनी पत्र्याची दुकाने उभारली आहेत.रात्री अचानक येथील फर्निचर दुकानातुन आगीच्या झळा येऊ लागल्या.काही क्षणांत या आगीने परिसरातील इतर दुकानांचा वेध घेतला.या ठिकाणी मोठे आवाज होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.फायर ब्रिगेडच्या2 गाड्या आल्यात. दोन गोडाऊन जळून खाक, आगीमुळे चिंचवड चा वीज पुरवठा खंडीत केला आहे.दोन कार जळून खाक 10 ते 12 चारचाकी गाड्या जळून खाक परिसरात बघ्यांची गर्दी झाली असून या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.