"तुमच्यासाठी हिऱ्याचे दागिने आलेत..."; पोलंडवरून आलेले गिफ्टसाठी तरुणीने गमावले ११ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:20 PM2023-02-07T18:20:17+5:302023-02-07T18:23:10+5:30

हा प्रकार १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ताथवडे येथे घडला...

"Gold and diamond ornaments have come for you..."; Young woman lost 11 lakhs for Polish gift | "तुमच्यासाठी हिऱ्याचे दागिने आलेत..."; पोलंडवरून आलेले गिफ्टसाठी तरुणीने गमावले ११ लाख

"तुमच्यासाठी हिऱ्याचे दागिने आलेत..."; पोलंडवरून आलेले गिफ्टसाठी तरुणीने गमावले ११ लाख

Next

पिंपरी : पोलंडवरून आलेले गिफ्ट मिळविण्यासाठी तरुणीने ११ लाख ४९ हजार ८० रुपये गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग आणि अन्य विविध चार्जेसच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी पैसे घेत फसवणूक केली. हा प्रकार १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ताथवडे येथे घडला.

आकाश सिंग, प्रकाश आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. ६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी तरुणीसोबत इंस्टाग्रामवरून मैत्री केली. विश्वास संपादन करून आकाश याने तरुणीसोबत व्हाट्सअपवर चॅटिंग सुरू केले.

दरम्यान त्याने तरुणींसाठी पोलंडवरून सोने व हिऱ्याचे ज्वेलरी आणि रोख रक्कम असलेले एक पार्सल पाठवले असून ते कस्टममधून सोडवून घे, असे सांगितले. दरम्यान तरुणीला एका महिलेने आणि प्रकाश नावाच्या व्यक्तीने फोन केले. त्या दोघांनी तरुणीकडून पार्सलची कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉण्डरिंग, पोलीस व्हेरिफिकेशन, ट्रान्सफर चार्जेस, इन्शुरन्स, स्टॅम्प चार्जेस आदींच्या बहाण्याने ११ लाख ४९ हजार ८० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास सांगितले. एवढी मोठी रक्कम घेऊन आरोपींनी तरुणीला कोणतेही पार्सल न देता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: "Gold and diamond ornaments have come for you..."; Young woman lost 11 lakhs for Polish gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.