कुटुंब टेरेसवर झोपायला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:11 IST2018-05-10T15:11:20+5:302018-05-10T15:11:20+5:30
वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे मध्यरात्री टेरेसवर झोपायला गेलेल्या कुटुंबातील घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी साडे पाच तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याचा प्रकार घडला.

कुटुंब टेरेसवर झोपायला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडले
पिंपरी-चिंचवड (वाकड) : ताथवडे येथे मे महिन्यातील वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे मध्यरात्री टेरेसवर झोपायला गेलेल्या कुटुंबातील साडेपाच तोळ्यांची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना बुधवारी (दि ९) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार ताथवडे येथील साई कॉलनीत घडला. घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी साडे पाच तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याचा प्रकार ताथवडेच्या सोनवणे वस्तीत साई कॉलनीत घडला.
याबाबत दादासाहेब शंकर काटे (वय २७, रा साई कॉलनी, सोनवणे वस्ती ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,घरातील सर्वजण उष्णतेच्या त्रासामुळे घराला कुलूप लावून टेरेसवरती झोपायला गेले. दरम्यान, चोरांनी घराचे कुलूप उचकटून कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेली साडे पाच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून वाकड पोलीस गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.