पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर..! प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत
By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2025 18:13 IST2025-01-24T18:09:58+5:302025-01-24T18:13:38+5:30
पहिल्या ५००० प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असतील.

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर..! प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत
पुणे : प्रवाशांना पुणेमेट्रोने प्रवास अधिक सुलभ व जलद करता यावा, याउद्देशाने पुणेकरंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांना मेट्रोने प्रवासासाठी खास सवलत दिली आहे. पुणे मेट्रोचे 'एक पुणे ट्रांझिट कार्ड' २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सवलतीमध्ये उपलब्ध असणार आहे.
पहिल्या ५००० प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असतील. नेहमी ११८ रुपये शुल्क असणारे हे कार्ड २६ जानेवारी रोजी प्रवाशांसाठी केवळ २० रुपयांत उपलब्ध असणार आहेत. हे कार्ड खरेदी करण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. आपल्या जवळच्या पुणे मेट्रो स्थानकाला पुणेकरांनी भेट देऊन हे कार्ड मिळवावे, असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले.
या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के सवलत आणि शनिवार-रविवारी ३० टक्के सवलत मिळणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी मेट्रोचा वापर करावा, यासाठी ही खास सोय प्रजासत्ताकदिनी पुणे मेट्रोने दिली आहे.