महापालिका कर्मचाऱ्यांना खूषखबर ; सातवा वेतन आयोग मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 07:39 PM2019-07-23T19:39:58+5:302019-07-23T19:43:39+5:30
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली असून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून ९००२ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
पिंपरी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली असून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून ९००२ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. आयोगामुळे कर्मचाऱ्याचे वेतन हे सुमारे १७ ते २२ टक्के वाढणार आहे. वेतनावर महापालिकेचा सध्या ३६ कोटी रूपये महिन्याला खर्च होतो. त्यात आठ कोटींची वाढ होऊन ४४ कोटी रूपये एवढा खर्च वेतनावर होणार आहे. कर्मचारी महासंघाने वेतन आयोग अंमलबजावणीचे स्वागत केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानपालिकेत विविध विभागांचे वर्ग एक ते चारचे कर्मचारी ७९५५ कर्मचारी असून शिक्षण मंडळासह सुमारे नऊ हजार दोन कर्मचारी महापालिकेत आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी महासंघाने राज्य शासनाकडे केली होती. तसेच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सरकारने महापालिका कर्मचाºयांना खुशखबर दिली आहे. राज्य शासनाने वेतनआयोग देण्यात यावा, अशा सूचना महापालिकेस दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाºयांना वेतनआयोगानुसार पुढील महिन्यांपासून वेतन मिळणार असून २०१६ पासूनच्या वेतन फरकाची रक्कमही देण्यात येणार आहे. अ वर्ग कर्मचाºयांचे वेतन हे २३ हजांरानी तर वर्ग दोनचे वेतन २१ हजार रूपयांनी, वर्ग तीनचे वेतन १७ हजार रूपयांनी वर्ग चारचे १० हजार रूपयांनी वाढणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकर्मचारी महासंघ अध्यक्ष, शशिकांत झिंजुर्डे म्हणाले,‘‘कर्मचारी महासंघाने, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांना मनपा कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागु करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानुसारकॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवड सह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत यांना सप्टेबरपासून वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. ’’