ध्यान योगी आचार्य श्री डॉ.शिवामुनी म.सा.यांचे चिंचवडमध्ये जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:08 PM2019-07-01T15:08:29+5:302019-07-01T15:15:52+5:30
आचार्यश्रींच्या स्वागताची जय्यत तयारी चिंचवडमध्ये करण्यात आली होती.
चिंचवड: हर्ष - हर्ष जय जय चा जयघोष करित ध्यानमुनी प.पु.आचार्य डॉ.श्री शिवमुनीजी म.सा.व युवाचार्य श्री महेंद्र ऋषीजी म.सा.आदी ठाणा यांचे चिंचवड मध्ये जंगी स्वागत करण्यात आले.आज सकाळी सात वाजता आकुर्डी जैन स्थानकातून या जैन मुनींचे चिंचवड येथे आगमन झाले.यावेळी हजारो जैन बांधव व जैन विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून गुरू भगवंतांचे दर्शन घेतले.
आचार्यश्रींच्या स्वागताची जय्यत तयारी चिंचवडमध्ये करण्यात आली होती.शहरातील रस्त्यांवर जैन बांधव मोठ्या संख्येत स्वागत करण्यासाठी सज्ज होते.आकुर्डीतील नवीन बांधण्यात आलेल्या जैन स्थानकातून आज या मुनींचे प्रस्थान झाले.याप्रसंगी संतोष कर्णावट,मनोज सोळंखी,प्रकाश मुनोत,राहुल पारख,नितीन बेदमुथा यांच्या सह निगडी,आकुर्डी,प्राधिकरण परिसरातील जैन बंधाव उवस्थित होते.उद्योगनगरातील नव्याने होत असलेल्या तेरा पंथी भवनास भेट दिल्यानंतर आचार्य श्री प्रेमलोकपार्क मार्गे चिंचवड गावातील जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणता दाखल झाले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.
या विद्यालयातील प्रत्येक विभागास भेट देऊन त्यांनी शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धाडीवाल,राजेश सांकला,सेक्रेटरी राजेंद्र मुथा,अनिल कांकरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.मंडळाच्या प्रांगणात जैन ध्वजाचे अनावरण आचार्यश्रींच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी स्काऊट,गाईड च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
चिंचवड मधील चापेकर चौक मार्गे शोभायात्रेच्या माध्यमातून गांधीपेठ जैन स्थानकात स्वागत करण्यात आले.जैन साधू संतांच्या जय घोषाने परिसर दुमाणून गेला होता.भोई आळी मार्गे या शोभायात्रेची सांगता कल्याण प्रतिष्ठान येथे झाली.या प्रसंगी संघाचे अध्यक्ष दिलीप नहार,सुरेश सेठिया,उमेश भंडारी,अशोक बागमार,प्रा.अशोक पगारिया,हेमंत गुगळे, संतोष धोका,राजेंद्र जैन,नंदकुमार लुणावत,मनोज बाफना,उपमहापौर सचिन चिंचवडे,नगरसेवक सुरेश भोईर,राजेंद्र गावडे,पिंपरी-चिंचवड सकल जैन संघाचे पदाधिकारी विर विशाल संघाचे अध्यक्ष मयुर शिंगवी,कार्यकर्ते,महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी,महिला कार्यकर्त्या व जैन बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.