पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले; अंदाज न आल्याने ६२ वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 02:08 PM2023-01-08T14:08:58+5:302023-01-08T14:09:06+5:30
मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये पर्यटनासाठी मुंबई येथील शिक्षक आले होते
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या मुंबई(कुर्ला)येथील एका शिक्षक पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय.६२) रा.कुर्लाइस्ट मुंबई नेहरुनगर मुंबई तर सद्या रा. चेंबुर मुंबई असे मृतांचे नाव असुन सविस्तर माहिती पोलीस चौकशी सुरू आहे.
हि घटना आज दि.८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास दुधिवरे गावाच्या हद्दत घडली असुन त्याठिकाणी लोणावळा ग्रामीण चे पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली मावळ रेस्क्यू टिमच्या माध्यमातून पाण्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले यांच्या सह स्थानिकांच्या मदतीने मृतदेह १ च्या सुमारास बाहेर काढला आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तळेगांव येथे नेण्यात आला आहे. पर्यटक पवनाधरणावर फिरण्यासाठी असल्याने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पवनाधरणाच्या पाण्यात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले होते. पोहत असताना धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने शिक्षक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण चे पोलीस तपास करत आहेत.