सफाई कामगारांनाही सरकारी सुट्या
By admin | Published: September 28, 2016 04:42 AM2016-09-28T04:42:19+5:302016-09-28T04:42:19+5:30
पिंपरी महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य विभागातील सफाई कामगारांनाही सरकारी सुट्यांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेतील १८०० सफाई कर्मचाऱ्यांना
पिंपरी : पिंपरी महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य विभागातील सफाई कामगारांनाही सरकारी सुट्यांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेतील १८०० सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २० आॅगस्टला सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्याबाबत बैठक झाली होती. या बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासनाच्या विचाराधीन होते. महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सरकारी सुटी मिळत नाही. सुटीदिवशीही त्यांना नेहमीप्रमाणेच कामावर यावे लागते. सुटीदिवशी केलेल्या या कामाचा अतिरिक्त लाभही त्यांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या नगर विकास विभागाने २७ सप्टेंबरला आदेश जारी केला आहे.
त्यानुसार, राज्यातील महापालिका, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांनाही आता सरकारी सुट्यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच सुटीदिवशी सफाई कर्मचाऱ्यांना काम करणे अपरिहार्य असल्यास त्यांना आर्थिक मोबदला द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
सरकारच्या या निर्णयाचा लाभ महापालिकेतील आरोग्य विभागातील एक हजार ८०० सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.