दहीहंडीतील गोविंदांनी हेल्मेट घालावे : पिंपरी पोलिसांच्या सुचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:01 PM2018-08-31T18:01:17+5:302018-08-31T18:06:53+5:30
दहीहंडीत गोविंदाने हेल्मेट परिधान करावे.गोविंदा पथकातील गोविंदाचा विमा उतरून घ्यावा, अशा सूचना पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्तांनी दिल्या आहेत.
वाकड : दहीहंडीत गोविंदाने हेल्मेट परिधान करावे.गोविंदा पथकातील गोविंदाचा विमा उतरून घ्यावा, अशा सूचना पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्तांनी दिल्या आहेत.
दोन दिवसांवर येऊ घातलेल्या दहीहंडी उत्सवाच्या आनंदावर काही विरजण पडू नये तसेच उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीहंडी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि ३१) दुपारी बैठक घेऊन सूचना दिल्या.यावेळी वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन यावेळी उपस्थित होते तर हद्दीतील अनेक दहीहंडी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी खालील सूचना दिल्या
गोविंदा पथक यांनी २० फुटापेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी लावू नये
गोविंदा पथकातील गोविंदा १८ वर्ष पूर्ण व त्यापुढील वयोगटाचे असावेत
सार्वजनिक रोडवर दहीहंडी उत्सव साजरा करू नये
मंडळाने कार्यक्रमासाठी सीसीटीव्ही बसवून घ्यावे
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात
स्वयंसेवक नेमावे, डीजे लाऊ नये