ग्रामसेवकाला लाच घेताना अटक, कातवी ग्रुप ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:17 AM2018-01-31T03:17:05+5:302018-01-31T03:17:21+5:30
वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना वडगावमावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. दीपक श्रीराम शिरसाठ (वय ४९, ग्रामसेवक, वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायत ता. मावळ, पुणे रा. फ्लॅट न. २०१, निओ रिगल सोसायटी, स्पाईन रोड, प्राधिकरण सेक्टर ६, मोशी, पुणे) असे पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
वडगाव मावळ - वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना वडगावमावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. दीपक श्रीराम शिरसाठ (वय ४९, ग्रामसेवक, वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायत ता. मावळ, पुणे रा. फ्लॅट न. २०१, निओ रिगल सोसायटी, स्पाईन रोड, प्राधिकरण सेक्टर ६, मोशी, पुणे) असे पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
वडगाव मावळ येथील जय बजरंग तालीमचे सचिवांनी त्यांच्याविषयी तक्रार दिली होती. या तालीममधील साहित्य खरेदीकरिता निधी मिळण्याकरिता त्यांनी अर्ज केला होता. हा निधी १४ वा वित्त आयोगाकडून ८ लाख ६८ हजार ४८० मंजूर झाला होता. याचा धनादेश मिळण्यासाठी ग्रामसेवकाने वीस हजारांची मागणी केली होती. त्यापैकी चौदा हजार यापूर्वी दिले होते. या कामाचा मोबदला म्हणून राहिलेले सहा हजार स्वीकारताना शिरसाठ यांना पंचायत समिती वडगाव मावळ कार्यालयाचे आवारात रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी व राजू चव्हाण यांनी केली.