महापुरुषांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:18 AM2017-08-02T03:18:52+5:302017-08-02T03:18:52+5:30

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेसह शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

Greetings to the great men | महापुरुषांना अभिवादन

महापुरुषांना अभिवादन

Next

पिंपरी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेसह शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. निगडी येथील लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसदस्या सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, अश्विनी बोबडे, नगरसदस्य तुषार कामठे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, सहायक आयुक्त आशा दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी उपस्थित होते.
तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निगडी येथील पुतळ्यास, तसेच महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील पुतळ्यास महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही पुष्पांजली अर्पण केली. या वेळी शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्या सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, अनुराधा गोरखे, चंदा लोखंडे, अश्विनी बोबडे, नगरसदस्य उत्तम केंदळे, बाळासाहेब ओव्हाळ, तुषार हिंगे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, तुषार कामठे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, सहायक आयुक्त आशा दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महिला प्रदेश काँग्र्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगुटमल, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, संकेत बोºहाडे, राजन नायर, सुनील राऊत, विठ्ठल कळसे, पांडुरंग जगताप, महेंद्र बनसोडे, राजू कुंभार, मकर यादव, शशीभाऊ कांबळे, भापकर नारखेडे, सुधाकर वावरे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.
अण्णा भाऊंच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण
सांगवी : येथील भाटनगर, पवनानगर भागातील परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ९७वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सांगवीतील जुनी सांगवी भागातील परिसरात विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यासह सामाजिक कार्यकर्ते, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्याला समृद्ध करणारे अण्णा भाऊ -कुलकर्णी
तत्कालीन सामाजिक व्यवस्थेमुळे अण्णा भाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले असले, तरी अडाणीपणाच्या कुबड्या झुगारून समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यांनी साहित्य समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमासाठी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रताप गुरव, चित्तरंजन जोशी, अशोक पारखी, पुष्कराज गोवर्धन, सुनील देशपांडे, राजन बुडुख, महेश बारसावडे, अ‍ॅड. अंतरा देशपांडे, गोपाळ कळमकर, अरुण बकाल, मुकुंद कुलकर्णी, अमेय देशपांडे, नरेश कुलकर्णी, सुहास पोफळे, संदीप बेलसरे, मोहन साठे, संजीवनी पांडे, माधुरी ओक, उज्ज्वला केळकर, उपेंद्र पाठक, प्रवीण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दिलीप कुलकर्णी म्हणाले, ‘‘समाजाच्या समस्या लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा अण्णा भाऊ साठे यांचा कयास प्रचंड प्रभावी होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या तीन शाहिरांनी अवघा महाराष्ट्र खडबडून जागा केला. त्यांपैकी अण्णा भाऊ साठे एक होते. शैक्षणिकदृष्ट्या अशिक्षित असणाºया अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक, पोवाडे, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्व साहित्य प्रकार सशक्त आणि समृद्ध केले. फकिरा कादंबरीमध्ये दुष्काळ, वैजयंता कादंबरीमध्ये स्त्रियांचे शोषण, माकडीचा माळ कादंबरीमध्ये भटक्या विमुक्तांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारात तत्कालीन समाजाचे वास्तविक रूप स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे मोलाचे कार्य आहे.’’
तरुणांनी पुस्तकाच्या आहारी जाणे गरजेचे
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी साहित्याची निर्मिती केली. अण्णा भाऊंनी केलेले लिखाण तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. अण्णा भाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी तरुणांनी पुस्तकाच्या आहारी जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांनी केले.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग लालटोपीनगर, मोरवाडी येथे त्यांच्या पुतळ्यास नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या वेळी अमित गोरखे बोलत होते. नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, अण्णा लोकर आदी या वेळी उपस्थित होते.
गोरखे म्हणाले, ‘‘अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला शाहीर म्हणून परिचित असले, तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकतीने हाताळले. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अशा अण्णांनी मराठी साहित्यातील लोकवाङ्मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबºया, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.
घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना अण्णा भाऊं नी साहित्याचे लिखाण केले. त्यांनी त्या काळी साहित्य, कथा, कादंबºया लिहिल्या आहेत. लिखाण हे त्यांचे पहिले प्रेम होते.

Web Title: Greetings to the great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.