जीएसटीमुळे गणेश मंडळांच्या वर्गणीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:48 AM2017-08-09T03:48:50+5:302017-08-09T03:48:50+5:30

गणेशोत्सव मंडळांमध्ये सध्या आर्थिक जुळवाजुळव कशी करायची याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जीएसटी तसेच बॅनरवर राजकीय पक्षांची चिन्हे नको, अशा गोष्टींमुळे मंडळांना मिळणाऱ्या निधीचे आर्थिक गणित २० ते २५ टक्क्यांनी कोलमडले असल्याची चर्चा गणेश मंडळांमध्ये आहे.

 GST reduction in Ganesha chapters | जीएसटीमुळे गणेश मंडळांच्या वर्गणीत घट

जीएसटीमुळे गणेश मंडळांच्या वर्गणीत घट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : गणेशोत्सव मंडळांमध्ये सध्या आर्थिक जुळवाजुळव कशी करायची याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जीएसटी तसेच बॅनरवर राजकीय पक्षांची चिन्हे नको, अशा गोष्टींमुळे मंडळांना मिळणाऱ्या निधीचे आर्थिक गणित २० ते २५ टक्क्यांनी कोलमडले असल्याची चर्चा गणेश मंडळांमध्ये आहे.
एकीकडे देणगीतून मिळणारी आवक कमी झाली असताना दुसरीकडे जीएसटीमुळे खर्च मात्र वाढल्याने उत्सवाचा उत्साह टिकवायचा कसा असा प्रश्न मंडळांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केवळ उत्साहच नाही तर या निधीमधून रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मदत, पुस्तकपेढीसारखे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवण्यात येतात. त्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वर्षातून एकदाच येणारा हा उत्सव धडाक्यातच साजरा होणार असे सांगत काही गणेशोत्सव मंडळे उत्सवाच्या खर्चामध्ये कपात करणार नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. मात्र जीएसटीमुळे व्यापाºयांकडून मिळणारा निधी ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. दुकानदार, लहान व्यापारी एवढेच नाही तर नागरिकही देणगी देताना जीएसटीचा फटका बसल्याचे सांगतात.

अनुदान तरी द्या!
 

Web Title:  GST reduction in Ganesha chapters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.