By admin | Published: January 24, 2017 10:52 PM2017-01-24T22:52:07+5:302017-01-24T22:52:07+5:30
निवडणूक इच्छुकांना मार्गदर्शन
Next
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७चे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र आॅनलाइन भरण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अर्ज सादर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील संत तुकारामनगर आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. या कार्यशाळेत सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरी सुविधा केंद्र चालक, सायबर कॅफेचे मालक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, स्टॅम्प व्हेंडर, महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच महापालिकेचे सर्व कॉम्प्युटर आॅपरेटर व नागरिक उपस्थित होते.
या वेळी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडील सुधीर बोराडे यांनी नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र भरणेकामी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संगणकाद्वारे सादरीकरण, तसेच दृक्श्राव्य माध्यमाद्वारे माहिती दिली.
तसेच आॅनलाइन निवडणूक अर्ज भरण्याबाबतचे प्रात्यक्षिकही सादर केले. नागरिकांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले.
पिंपरी : लोकशाही बळकटीसाठी युवकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. सर्वच क्षेत्रांत युवक पुढे येत आहेत, ही लोकहितासाठी जमेची बाजू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण सर्वांनीच क्रांती घडवून आणावी, असे आवाहन सहायक आयुक्त तथा मतदारनोंदणी अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले.
महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन व मतदान जनजागृतीनिमित्त युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथे झाले. त्या वेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते. या वेळी प्रा. नितीन घोरपडे, मतदान जनजागृती मोहिमेच्या ब्रँड अम्बँसिडर मृण्मयी गोंधळेकर, डॉ. सुधीर बोºहाडे, डॉ. रंजिता चॅटर्जी, डॉ. सविता कुलकर्णी, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, रमेश भोसले आदी उपस्थित होते.