‘रेन हार्वेस्टिंग’ बाबत वाल्हेकरवाडीत मार्गदर्शन
By admin | Published: May 12, 2017 05:11 AM2017-05-12T05:11:30+5:302017-05-12T05:11:30+5:30
पावसाचे पाणी शास्त्रीय दृष्ट्या जमिनीत मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग या शास्त्रशुद्ध पद्धतीची जमिनीतील पाणीपातळी
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : पावसाचे पाणी शास्त्रीय दृष्ट्या जमिनीत मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग या शास्त्रशुद्ध पद्धतीची जमिनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी निश्चितच मदत होईल. पाणी समस्येवर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच अगदी प्रभावी आणि अत्यंत स्वस्त उपाय आहे, असे राष्ट्रीय जलतज्ज्ञ शशिकांत दळवी यांनी व्यक्त केले. वाल्हेकरवाडीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणी प्रश्नांवर उपाय करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प हाती घेण्यात आला़ या वेळी ते बोलत होते. पाणी हा विषय येणाऱ्या काळात चिंतेचा विषय ठरणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
दळवी म्हणाले, ‘‘भारतात एकूण पडणाऱ्या पावसाच्या ३५ टक्के पावसाचे पाणी हे वापरले जाते. व ६५ टक्के पाणी वाहून जाते. चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने साठवण केल्यास आपण पुढील आठ महिन्यांच्या पाण्याचे नियोजन यशस्वीपणे करू शकतो. वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर भागात भुलेश्वर प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन याच्या सहकार्याने भुलेश्वर मंदिर येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय जलतज्ज्ञ कर्नल शशिकांत दळवी यांनी युवकांना पाण्याचे महत्त्व आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांनी डॉ. सीमा निकम यांच्या बरोबर जलप्रतिज्ञा घेतली.