हेल्मेट परिधान करणा-यांना गुलाबपुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:29 AM2017-08-05T03:29:16+5:302017-08-05T03:29:16+5:30
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन शाळेत शिशूविहारच्या बनीटमटोला व प्राथमिक विभागासाठी कब बुलबुल पथकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हेल्मेट घालणाºया चालकांना गुलाबपुष्प दिले.
पिंपरी : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन शाळेत शिशूविहारच्या बनीटमटोला व प्राथमिक विभागासाठी कब बुलबुल पथकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हेल्मेट घालणाºया चालकांना गुलाबपुष्प दिले.
पिंपरी-चिंचवड भागातील विविध अपघातात हेल्मेट नसल्याने अनेकांना जीव गमवावा, लागला आहे. त्यामुळे प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात आला.
चिंचवड स्टेशन चौकात बनीटमटोला आणि कब बुलबुल या दोन्ही पथकाच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालून वाहन चालवणाºया वाहनचालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. तर वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट न वापरणाºयांनी जीव धोक्यात घालून वाहन चालवू नये असे आवाहन केले. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरायलाच हवे, असे मुलांनी केले.
मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमास जयप्रकाश राका, राजेंद्रकुमार राका उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आर. एच. गारगोटे, व्ही. के.
मुसळे, व्ही. एस. जगताप यांनी
केले.