कचरा टाकणा-याचे गुलाबपुष्पाने स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:45 AM2017-08-03T02:45:44+5:302017-08-03T02:45:44+5:30
चिंचवडेनगर येथील शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन गांधीगिरीच्या माध्यमातून केले.
रावेत : चिंचवडेनगर येथील शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन गांधीगिरीच्या माध्यमातून केले.
चिंचवडेनगर चौकात वाल्हेकरवाडी मार्गावर फत्तेचंद जैन विद्यालय, गुरुमैया विद्यालय आणि इतर विद्यालये आहेत. या चौकातून दररोज शेकडो मुले, महिला, नागरिक ये-जा करतात. पूर्वी या परिसरातून नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत असे. कचराकुंडी भरून वाहत असे. रस्त्यावरून धोकादायकरीत्या मुलांना आणि महिलांना पायी प्रवास करावा लागत असे. मात्र नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या प्रयत्नातून येथील कचराकुंडी हलवून पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. सुसज्ज फुटपाथ तयार करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे लोकांना विनंती करूनही नागरिक तेथेच थोड्या अंतरावर कचराकुंडी असतानादेखील कुंडीत कचरा न टाकता बिनधास्तपणे रस्त्यावर कचरा टाकीत असे. हे चित्र बदलण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून नगरसेविका चिंचवडे, शेखर चिंचवडे, गणेश बोरा, संस्कार प्रतिष्ठानाचे वसंत ढवळे, शिवाजीराव कामथे, शेखर चिंचवडे यूथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते कचरा टाकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन करण्यात आले.
आपणही रस्त्यावर/ गाडीवर जाताना कोठेही कचरा टाकू नका. कचरा टाकणाºया नागरिकांना एक सजग नागरिक म्हणून प्रबोधन करा, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा, असे आवाहन करण्यात आले.
रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गांधीगिरीच्या माध्यमातून कचरा न फेकण्याचे आवाहन करताना शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते.