स्मार्ट सिटीमध्ये ‘गुंडाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:14 AM2019-01-14T01:14:18+5:302019-01-14T01:14:31+5:30

कृष्णानगर : तोडफोडीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशतीखाली

'Gundaraj' in Smart City | स्मार्ट सिटीमध्ये ‘गुंडाराज’

स्मार्ट सिटीमध्ये ‘गुंडाराज’

Next

तळवडे : कृष्णानगर प्रभागात टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराला वेळीच प्रतिबंध करण्याची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून वेळीच या घटनांना पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटीच्या प्रांगणात गुंडाराजची झलक पाहावयास मिळत आहे.


पिंपरी, चिंचवड शहरातील सर्व सोयी सुविधांनीयुक्त असणारा व शांतताप्रिय नागरिकांचा वास असणारे उपनगर म्हणजे चिखली प्राधिकरणाची ओळख आहे़ मात्र याच परिसरात माथाडी नेता प्रकाश चव्हाण आणि इयत्ता १० वीमध्ये शिकणारा विद्यार्थी वेदांत भोसले यांच्या खुनाच्या घटना घडल्यामुळे परिसर हादरून गेला होता. दमदाटी करणे, टोळक्याने हातात घातक शस्त्र घेऊन तोडफोड करण्याच्या घटना तर नियमितपणे घडत असून, येथील समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


चौकाचौकांत, क्लासेस व शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओ बसलेले दिसतात. या भागात नवीन राहण्यास आलेला बहुतांशी वर्ग कामगार, भाजीपाला विक्री, टेम्पोचालक व इतर लहान व्यावसायिक आहेत. बहुतेकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. यामुळे गुन्हेगारांचे फावत असून, वेळीच अशा गुन्हेगारांवर पोलिसांनी जरब बसविण्याची गरज आहे. सध्या शहरात फ्लेक्स दादा ही संकल्पना चांगलीच रूजली आहे. ज्यांना कोणीही ओळखत नाही त्यांच्याकडे कोणते पद नाही, अशा एखाद्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लावलेल्या फ्लेक्सवर राजकीय नेते, पुढाऱ्यांचे फोटो शुभेच्छुक म्हणून छापले जातात़ बहुतेक याची कल्पनाही राजकीय पदाधिकाºयांना नसते, याचाच गैरफायदा असे फ्लेक्स दादा घेतात़ आपल्या पाठीमागे मोठ्या पदाधिकाºयांच्या हात असल्याचा गवगवा करून गैरफायदा घेत दादागिरी सुरू होते.


या प्रकाराला रोखण्याची गरज असून, उठ सूठ लाव फ्लेक्स या मानसिकतेचे हे दुष्परिणाम आहेत. राजकीय पुढारी व पदाधिकारी यांनीही आपला फोटो वापरण्याची परवानगी देताना संबंधित व्यक्तीचे समाजातील स्थान व वर्तवणूक यांचा सारासार विचार केल्यास होणाºया गैरप्रकाराला आळा घालता येईल.


पोलिसांच्या गस्तीची गरज
परिसरातील उद्यानांमध्ये सायंकाळच्या सुमारास मद्यपी, गर्दुल्ले यांचे टोळके बसलेले असते, यामुळे महिला सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी उद्यानात फिरणे अवघड होत आहे. शाळा व कॉलेजच्या परिसरात सकाळी आणि रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे.
हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी उद्यान परिसरात गस्त घालावी, नशापान करणाºयांना उद्यानात मज्जाव करावा. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात शाळा महाविद्यालय परिसरात पोलिसांचा खडा पहारा असावा, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी ज्या बस मार्गाचा अवलंब करतात त्या ठिकाणी फिरते पथक असावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुन्हा एकदा तोडफोड सत्र
४नुकतीच या परिसरातील महात्मा फुलेनगर येथे तरुणांनी गाड्यांच्या काचा फोडल्या, बुलेट दुचाकीचा आरसा काढून नेला, पाणीपुरीच्या गाडीची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने या भागातही गुन्ह्याचे लोण पसरत आहे़ गुन्हेगार निर्ढावलेले असून, गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहेत़ मात्र याची तक्रार करण्यास सहसा पोलिसांकडे जाण्यास धजावत नाहीत.

Web Title: 'Gundaraj' in Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.