डांगे चौकात जप्त केला १ लाख ९० हजारांचा गुटखा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 09:57 PM2018-12-07T21:57:17+5:302018-12-07T21:57:59+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त केला.
वाकड : अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त केला. ही करवाई गुरुवारी (दि ६) दुपारी साडे तीन साजरा करण्यात आली.
याप्रकरणी श्रीपतराम देवाजी भाटी (वय ५३, ओंकार कॉलनी, गणेश नगर थेरगाव) या चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील एमएच १४, एफटी ०१५४ या क्रमांकाचा टेंपो देखील हस्तगत करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाची गस्तसुरु असताना पोलीस हवालदार राजन महाडिक यांना डांगे चौकातील एका टेम्पोत गुटखा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पथक गेले डांगे चौकातील एका कार्यालयासमोर एक टेंपो संशयितरित्या थांबल्याचे दिसले तेव्हा टेम्पो चालक भाटी याला ताब्यात घेऊन टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोत १ लाख ९० हजार रुपयांचा बेकायदा गुटखा आढळून आला.
अन्न व भेसळ अधिकाऱ्यांच्या मदतीने वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वसंत मुळे, प्रशांत महाले, हवालदार , राजन महाडिक, प्रदीप शेलार, बाळासाहेब सूर्यवंशी, रमेश भिसे, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर, दादा धस यांच्या पथकाने केली.