महिनाअखेरीस शाळेला अर्धा दिवस सुटी
By admin | Published: December 31, 2016 05:30 AM2016-12-31T05:30:36+5:302016-12-31T05:30:36+5:30
शिक्षकांना शालेय कामकाजासाठी अधिक वेळ मिळावा, शालेय नियोजनात सुसूत्रीपणा यावा यासाठी महिनाअखेरीस फक्त अर्धा दिवसच शाळा भरणार, असा निर्णय
पिंपरी : शिक्षकांना शालेय कामकाजासाठी अधिक वेळ मिळावा, शालेय नियोजनात सुसूत्रीपणा यावा यासाठी महिनाअखेरीस फक्त अर्धा दिवसच शाळा भरणार, असा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. याची अंमलबजावणी जानेवारी २०१७ पासून दर महिन्याला करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे यांनी दिली.
शहरातील बहुतांशी खासगी प्राथमिक शाळा या महिन्याच्या शेवटी फक्त अर्धा दिवसच भरतात. तसेच शिक्षक युनियनकडूनही शालेय कामकाजास अतिरिक्त वेळ मिळावा, यासाठी या अर्धा दिवस शाळेसाठी सतत मागणी केली जात होती. या धर्तीवर शिक्षण मंडळाने
शहरातील मनपाच्या शाळा महिनाअखेरीस अर्धा दिवसच सुरु ठेवणार असल्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.(प्रतिनिधी)
- शहरात मनपाच्या प्राथमिक विभागाच्या १३१ शाळा आहेत. त्यातून सुमारे चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच शाळांत हा निर्णय राबविण्यात येणार आहे. मनपाच्या शाळांना राष्ट्रीय, धार्मिक सणवार व इतर आदी वार्षिक सुट्या मिळतात. सुट्यांच्या या यादीत अर्ध्या सुटीची भर पडणार आहे.