काळेवाडीत टोळक्याचा राडा; दगड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला करत माजवली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:53 PM2021-03-20T19:53:39+5:302021-03-20T19:54:50+5:30

किरकोळ कारणावरून जीवघेणी मारामारी...

Half murder type attack on youth by criminal gang in kalewadi | काळेवाडीत टोळक्याचा राडा; दगड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला करत माजवली दहशत

काळेवाडीत टोळक्याचा राडा; दगड अन् कोयत्याने प्राणघातक हल्ला करत माजवली दहशत

googlenewsNext

पिंपरी : भांडणात समजूत काढणाऱ्या तरुणाला दगडाने व कोयत्याने वार करून मारहाण केली. तसेच टोळक्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. काळेवाडी फाटा येथील पुलाखाली गुरुवारी (दि. १८) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

किरण उत्तम लोंढे (वय २६, रा. रहाटणी, काळेवाडी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. १९) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक मुकुंद मोरे (वय १८ वर्षे ६ महिने, रा. आंबेजोगाई, बिड), अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चेतन साळवी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), तसेच आरोपी अशोक मोरे याचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे यांचा ट्रॅव्हल्स बसचा व्यवसाय आहे. त्यांच्या बसवर काम करणारा ज्ञानेश्वर सगर हा प्रवाशांना बसमध्ये बसवत असताना आरोपी चेतन साळवी हा बच्चा दरवाजा मध्ये उभा राहिला होता. ज्ञानेश्वर सरगर याने त्याला दरवाज्यातून बाजूला उभे राहण्यास सांगितले. चेतन याला त्याचा राग आला. त्यातून त्याने ज्ञानेश्वर याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यामुळे फिर्यादी लोंढे हे चेतनची समजूत काढत होते. त्यावेळी आरोपी चेतनने त्याच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयते हातात घेऊन फिर्यादीच्या जवळ येऊन रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या पायावर मारला. तसेच कोयत्याने वार केल्याने फिर्यादी लोंढे जखमी झाले. तसेच आरोपींनी लोंढे यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावर पडलेले दगड उचलून फिर्यादीचा मावस भाऊ सचिन पावडे याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरडाओरडा करून दहशत निर्माण करून आरोपी दुचाकीवरून निघून गेले.

Web Title: Half murder type attack on youth by criminal gang in kalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.