धोकादायक इमारतींवर हातोडा

By admin | Published: March 21, 2017 05:19 AM2017-03-21T05:19:02+5:302017-03-21T05:19:02+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन किंवा पर्यायी व्यवस्था न करता त्या इमारती

Hammer on dangerous buildings | धोकादायक इमारतींवर हातोडा

धोकादायक इमारतींवर हातोडा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन किंवा पर्यायी व्यवस्था न करता त्या इमारती तत्काळ रिकाम्या करून जमीनदोस्त करा,
असे आदेश राज्य सरकारने
दिले आहेत. ६३ इमारतींमधील नागरिकांनी बेघर होण्याची वेळ येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी शिळफाटा येथील लकी कंपाउंडमध्ये इमारत कोसळून ७२ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने अशा घटना टाळण्यासाठी विविध उपाय सुचवले होते.
अवैध इमारत धोकादायक झाल्यास तेथे राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची जबाबदारी महापालिकेची नाही, असेही या समितीने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या या आदेशामुळे धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना तेथून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांना महापालिकेकडून कोणतेही हमीपत्र मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा घरावरील ताबाही जाणार आहे. महापालिकेने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात त्रेसष्ठ इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. आता नव्याने सर्वेक्षणात शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या आदेशानुसार या इमारतींवर हातोडा पडणार आहे. त्यामुळे इमारत धोकादायक असल्याचे जाहीर झाल्यानंतरही पर्यायी जागा नसल्याने किंवा मालकी हक्क जाऊ नये, म्हणून तेथेच राहणाऱ्या हजारो रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.