अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By admin | Published: June 15, 2017 04:49 AM2017-06-15T04:49:25+5:302017-06-15T04:49:25+5:30

पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे रहाटणी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर शुक्रवार आणि शनिवारी धडक कारवाई

Hammer on unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांवर हातोडा

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे रहाटणी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर शुक्रवार आणि शनिवारी धडक कारवाई करण्यात येणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
रहाटणी येथे मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचे (एचसीएमटीआर) आरक्षण आहे. साई चौक ते रहाटणी येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम करण्यास कोकणे चौक ते काळेवाडी फाटा ३० मीटर एचसीएमटीआर मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून नियोजन केले आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पिंपरी-चिंचवड प्राधिकरण नवनगर विकासचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांची नुकतीच बैठक झाली. त्यानुसार रहाटणी येथील एचसीएमटीआर मार्गावरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार तीस मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फतकारवाई
करण्यात येणार आहे. या जागेवर विकास योजनेनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे.
वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.

रहाटणी ते कासारवाडीपर्यंत एचसीएमटीआर रस्त्याच्या जागेचे आरक्षण पालिकेच्या हद्दीत येत आहे. या अनधिकृत बांधकामावर पालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रहाटणी येथील एचसीएमटीआरच्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या अगोदरच नागरिकांनी रहाटणी येथील प्राधिकरण हद्दीपासून कोकणे चौकापर्यंत तीस मीटर रुंद एचसीएमटीआर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे काढण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या रस्त्याच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

Web Title: Hammer on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.