वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घे म्हणत छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By प्रकाश गायकर | Published: March 8, 2024 04:37 PM2024-03-08T16:37:04+5:302024-03-08T16:38:01+5:30

किरकोळ कारणावरून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला, याबाबत पोलिसांत तक्रार करू नये यासाठी तिला धमकीही दिली होती

Harassment saying share in father wealth The extreme step taken by the married | वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घे म्हणत छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घे म्हणत छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी : वडीलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा माग यासाठी पत्नीचा वारंवार छळ केला. जमिनीतील तिच्या वाटणीचा हिस्सा मागण्यासाठी तिच्यासोबत भांडण करत तिला शारिरीक व मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.  ही घटना बुधवारी (दि.६) वडमुखवाडी येथे घडली. 

याप्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.७) फिर्याद दिली आहे. त्यावरून पती प्रसाद बाळासाहेब वीर (वय २९ रा.वडमुखवाडी), दोन महिला आरोपी, सासरे बाळासाहेब नानासाहेब वीर ( रा.आष्टी बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा २४ फेब्रुवारी २०२२ साली प्रसाद वीर याच्याशी विवाह झाला. मात्र मागील पाच ते सहा महिन्यांपासून संशयित आरोपी हे पिडीतेला तू मुलगी आहेस तुझा वडिलांच्या संपत्तीवर तुझा हक्क आहे. तू जमिनीतील वाटा माग म्हणत वेळोवेळी भांडणे केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून पिडीतेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत पोलिसांत तक्रार करू नये यासाठी धमकी दिली. पती व सासरच्या कंटाळून पीडितेने अखेर राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Harassment saying share in father wealth The extreme step taken by the married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.