महागाव गणात भाजपाची हॅट्ट्रिक

By admin | Published: February 24, 2017 02:51 AM2017-02-24T02:51:59+5:302017-02-24T02:51:59+5:30

महागाव गणात भाजपाने यशाची हॅट्ट्रिक नोंदवीत गड राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद गटातही विजय मिळविला.

The hat-trick of BJP in Mahagaon Ganga | महागाव गणात भाजपाची हॅट्ट्रिक

महागाव गणात भाजपाची हॅट्ट्रिक

Next

पवनानगर : महागाव गणात भाजपाने यशाची हॅट्ट्रिक नोंदवीत गड राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद गटातही विजय मिळविला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल गुरुवारी जाहीर झाला. महागाव गणात भाजपाच्या जिजाबाई पोटफोडे ९४७च्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादी पक्षाच्या मंगल आढाव यांना पराभव पत्करावा लागला. या गणात भाजपाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, उमेदवारी जाहीर करताना भाजपाने दुसऱ्या गणातील आयात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाची गटबाजी उफाळली. उमेदवारी लादणाऱ्यांचा गणातील पक्ष कार्यकर्त्यांनी निषेध केला. यामुळे वातावरण चिघळले. आमदार बाळा भेगडे व ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांनी बैठक घेऊन या वेळी मान्य करा असे सांगत कार्यकर्त्यांना समजावले. ज्ञानेश्वर दळवी व एकनाथ टिळे या दोन्ही माजी सभापतींनी कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करत पक्षाचा आदेश पाळण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनी पक्षादेश पाळत उमेदवार विजयी करण्याची शपथ घेतली. कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेले काम यामुळेच उमेदवार आयात करूनही भाजपाने विजय मिळवला. राष्ट्रवादीने मंगल आढाव यांना उमेदवारी दिली. कार्यकत्यार्नी एकदिलाने काम केले. मात्र पक्षश्रेष्ठींनी येथे एकही सभा दिली नाही. (वार्ताहर)

Web Title: The hat-trick of BJP in Mahagaon Ganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.