हौशी प्राणीमित्रांचं 'हटके' सेलिब्रेशन; चक्क गोंडस मांजरांच्या पिल्लांचं केलं बारसं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:45 PM2021-08-16T21:45:07+5:302021-08-16T21:47:04+5:30
हौशी प्राणीमित्रांचं 'हटके' सेलिब्रेशन; चक्क गोंडस मांजरांच्या पिल्लांचं केलं बारसं
पिंपरी : मांजर आडवी गेली तरी काम होत नाहीत अशी अंधश्रध्दा मानतात. या अंधश्रध्देला फाटा देत भरपूर प्राणी प्रेमी मांजर पाळतात. निगडीतील हौशी प्राणीप्रेमी धनाजी सोंडकर यांनी चक्क मांजरेच बारसं केलं आहे.
"गळ्यात घंटा, लोकरीचे उबदार कपडे, बसण्यासाठी ऐटबाज जागा, थाटामाटात साजरं होणारं बारसं', हे सर्व एखाद्या गोंडस बाळाच्या पालन-पोषणाप्रमाणेच मनीमाऊचे नखरे प्राणीप्रेमी धनाजी सोंडकर पुरवित आहेत. त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या पिलांचा बाराव्या दिवशी बारस्यांचा कार्यक्रम अगदी थाटामाटात केला. हौसेला मोल नसतं, असं म्हटलं जातं. मात्र याची प्रचिती सध्या पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत.
मांजर दत्तक घेण्यापासून ते तिचं आजारपण, शेजाऱ्यांचा किंवा सोसायट्यामधील नागरिकांचा त्रास, रस्त्यावरील मांजरानाही लळा लावून दत्तक घेण्याची मोहीम, त्याचं खानपान, दिवसभरात त्यांची दंगा मस्ती, नेहमीपेक्षा हिरमुसलेली मांजर आणि त्यांची सर्व प्रकारची घ्यावी लागणारी काळजी हे सर्व एखाद्या लहान बाळांसारखे त्या मांजराचे करावे लागते. सामान्यांसाठी हे डोकेदुखीचं असते. मात्र, हौशी सोंडकर हे सगळं आनंदाने करतात.
-
मला लहानपणापासूनच प्राणी पाळण्याची आवड आहे. अगदी कुत्रा, मांजर हे प्राणी तर नेहमी माझे लाडकेचं. आपण आपल्या मुलांचे सर्व विधी साग्रसंगीत करतो. तर त्या प्राण्यांचे का नको करायला त्यांना जीव लावला तर ते आपल्यावर जीव ओवाळून टाकतात.
- धनाजी सोंडकर, प्राणीप्रेमी, रुपीनगर-निगडी.