हौसेला लाखाचे मोल
By admin | Published: October 29, 2016 04:29 AM2016-10-29T04:29:48+5:302016-10-29T04:29:48+5:30
सण म्हटलं की, नवीन वस्तू, उपकरण, वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो़ त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी असते़ त्यासाठी फ क्त हौस
पिंपरी : सण म्हटलं की, नवीन वस्तू, उपकरण, वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो़ त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी असते़ त्यासाठी फ क्त हौस असायला हवी़ याचा प्रत्यय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला येत आहे़ दसऱ्यापासून नवीन वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे़ त्याचबरोबर मुहूर्तावर खरेदी केलेल्या वाहनासाठी मनाप्रमाणे पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी हजारापासून ते लाख रुपयांपर्यंत लिलाव होत आहेत.
राज्य परिवहन विभागाने पसंतीच्या क्रमांकासाठी चार कक्ष केले आहेत़ त्यामध्ये व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, आर्कषक आणि मोस्ट व्हीआयपी असे कक्ष आहेत़ ग्राहकांच्या पसंतीनुसार जर क्रमांक हवा असेल, तर जादा रक्कम भरून क्रमांक मिळविता येतो. त्यासाठी ग्राहकांची वर्दळ पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक कार्यालयात होत आहे़ त्याठिकाणी लिलाव करून पसंती क्रमांक दिले जातात.
नवरात्र, दसरा आणि आता दिवाळी असे एकामागून एक सण आले आहेत. मुहूर्तावर वाहनांची खरेदीबरोबर व आक र्षक क्रमांक मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा होत आहे. दुचाकीचा पसंतीचा क्रमांक मिळवायचा असेल, तर सलग आकड्यांसाठी पाच हजारांपासून आणि चारचाकी, ब्रँड गाड्यांना पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी साधारण दहा हजारांपासून बोली सुरू होते. एका सीरिजमध्ये क्रमांक हवा असेल, तर इतरांच्या स्पर्धेत आपल्याच गाडीला चांगला क्रमांक मिळावा, यासाठी गाड्या घेतल्याबरोबर उपप्रादेशिक कार्यालयात पैसे भरण्यासाठी गर्दी होत आहे़
एकंदरीत लाखो रुपयांची वाहने खरेदी करण्यासाठी शोरूममधील गर्दी त्याच वाहनांना पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी हजारो रुपये खर्च करीत आहेत़ (प्रतिनिधी)
जादा रक्कम : विषम आकड्यांना पसंती
वाहनधारकांची सर्वाधिक पसंती १०१०, ५०५०, ०१०१ या क्रमांकाला मिळत आहे. राजकारणी मंडळींकडून १, १००, १००१, ५००१, ८८८८, ९९९,९९९९ असे क्रमांक मिळविण्यासाठी जादा रक्कम मोजली जात आहे़ तर पोलीस क्षेत्रात काम करण्याऱ्यांकडून १००, वकिली करणाऱ्यांकडून ३०२ पसंतीच्या क्रमांकाला अधिक मागणी आहे़
आकर्षक क्रमांकासाठी वेटिंग
हौशी ग्राहकांकडून पसंतीच्या क्रमांकासाठी बोली लावल्यामुळे सामान्य नागरिकांना जो क्रमांक उपप्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात येतो, त्यावर समाधान मानावे लागत आहे़ अनेक वेळा वाहन घेतल्यानंतर ग्राहकांकडून आकड्यांची गोळाबेरीज, शुभ-अशुभ, जन्मतारीख, लाभदायक अंक पाहून क्रमांक मिळविण्यासाठी परिवहन कार्यालयात आग्रह केला जात आहे़ जर मनासारखा पसंतीचा क्रमांक मिळाला नाही, तर ग्राहकांद्वारे नवीन क्रमांकाच्या सीरिजची वाट पाहिली जात आहे़