'ड्राय डे’च्या दिवशी दारू पिणं पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 19:15 IST2019-11-10T19:09:00+5:302019-11-10T19:15:32+5:30
'ड्राय डे' च्या दिवशी दारु ऑनलाईन मागवने एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्याची 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

'ड्राय डे’च्या दिवशी दारू पिणं पडले महागात
पिंपरी : ‘ड्राय डे’च्या दिवशी ऑनलाइन दारू खरेदी करणाऱ्या एकाची ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे शनिवारी (दि. ९) घडली.
पियाली दुलाल कर (वय ३२, रा. पेबल्स सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पियाली यांनी ऑनलाइन घुले वाईन शॉप यांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र आज ड्राय डे असल्याने तुम्ही ऑनलाइन बुकींग करा, मी आपल्या पत्त्यावर दारू पाठवितो, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्यानुसार फिर्यादी पियाली यांनी ओटीपी नंबर शेअर केला असता त्यांच्या बँक खात्यातून प्रथम ३१ हजार ७७७ आणि त्यानंतर १९ हजार १ रुपये असे एकूण ५० हजार ७७८ रुपये काढून घेतले आणि दारू न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.