पाणीपुरवठ्याबाबत कागदी घोडे

By admin | Published: January 25, 2017 01:48 AM2017-01-25T01:48:42+5:302017-01-25T01:48:42+5:30

येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून

Hawthorn | पाणीपुरवठ्याबाबत कागदी घोडे

पाणीपुरवठ्याबाबत कागदी घोडे

Next

देहूगाव : येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असून, ही योजना येथून पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने चालविणार नसल्याचे कळविले होते. या पत्रावर देहूगाव ग्रामपंचायतीने व ग्रामसभेने आक्षेप नोंदवित काही मुद्दे उपस्थित करून ही पाणीपुरवठा योजना आहे तशी ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली होती, असे असूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील नागरिक केवळ पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य करीत नसल्याच्या ठपका ठेवून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दुरूस्ती व देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत हस्तांतरण करून घेण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रपंच करीत आहे.
यावर देहूगाव ग्रामपंचायतीने पुन्हा आक्षेप घेत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत योजनेचे हस्तांतरण करणेत येणार नसल्याचे आणि नवीन पाणी पुरवठा योजना देहूसाठी योग्य व पुरेशी असेल, तरच नवीन पाणी योजनेसह सर्व पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्याबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत आपणास कळविण्यात येईल, तोपर्यंत ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच चालवावी, असे निवेदनाद्वारे कळविले आहे. देहूगावला १९६७ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्याच्या पाणी पुरवठा योजनेची क्षमता १.७५ दशलक्ष लिटर असून गावचा विकास होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच या परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा अनियमित होऊ शकतो म्हणत हा मुद्दा फेटाळला आहे. मीटरद्वारे पाणीपुरवठा करणेबाबत जीवन प्राधिकरण म्हणते की, ही पाणीपुरवठा योजनेत मीटर बसविण्याचे प्रयोजन नव्हते तर सर्व ग्राहकांना ठोस पाणी पुरवठा करावा असे प्रयोजन होते. त्यामुळे ही योजना हस्तांतरण प्रक्रियेकरीता हा मुद्दा योग्य वाटत नसल्याचे स्पष्ट करीत ग्रामपंचायतीने उपस्थित केलेले सर्व आक्षेप फेटाळले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Hawthorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.