संचालक पदावर असताना स्वतःच्याच कर्मचाऱ्यासह केली कंपनीची तीन कोटींची फसणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:52 PM2023-02-03T17:52:38+5:302023-02-03T17:52:45+5:30
कंपनीच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी दिलेल्या इ-मेलचा वापर करून आरोपींनी फिर्यादीच्या कंपनींची फसवणूक केली
पिंपरी : कंपनी वाढवण्याचे आमिष दाखवून कंपनीत भागीदारी घेत विश्वास संपादन केला. त्यानंतर संचालक पदावर असताना स्वतःच्याच कर्मचाऱ्यासह मिळून कंपनीची तीन कोटींची फसणूक केली. एमआयडीसी भोसरी येथील ऋतिक टुल्स येथे २०१५ ते २०१७ या दोन वर्षात हा प्रकार घडला.
याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. २) एमआयडीसी भोसरी येथे तक्रार केली. आनंद ईश्वरचंद मित्तल (वय ४३ रा. वाकड) व तेजश्री शेट्टी (वय ३७ रा. भोसरी) यांच्या विरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पतीच्या कंपनीची वाढ करण्याचे आमिष दाखवून आरोपीने भागीदारी घेतली, डायरेक्टर पदावर असताना २०१५ ते २०१७ या कालावधीत कंपनीचे तयार झालेले १८ हजार ३१४ नगांची एकूण एक कोटी ७५ लाख ४ हजार १०२ रुपयांच्या चलनावर मित्तल व शेट्टी यांनी परस्पर सही केली. तसेच कंपनीचे कोटींग मटेरिअल ९३ हजार ७२९ नग एक कोटी २८ लाख ४० हजार ३२९ रुपयांच्या चलनावरही परस्पर सही केली. ग्राहकाकडून आलेले तीन कोटी तीन लाख ४४ हजार ४३१ रुपयांचे बिल न बनवता परस्पर स्वतःच्या खात्यावर जमा केले. हा सारा प्रकार बील पुस्तकाच्या पाहणीमध्ये समोर आला. कंपनीच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी दिलेल्या इ-मेलचा वापर करून आरोपींनी फिर्यादीच्या कंपनींची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.