महिलेचा पाठलगा करत पोहोचला मुलांच्या शाळेपर्यंत; विनयभंग करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:42 PM2022-12-02T12:42:06+5:302022-12-02T12:42:18+5:30
फेसबूकवरून महिलेचा क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला
पिंपरी : फेसबूकवरून महिलेचा क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर महिलेला वारंवार फोन करून त्रास दिला. महिलेने फोन घेतला नाही म्हणून आरोपी पाठलाग करत महिलेच्या मुलांच्या शाळेपर्यंत पोहचला. तसेच महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून विनयभंग केला. ही घटना मागील दीड महिन्यापांसून एक डिंसेबर २०२२ या कालावधीत घडला. या प्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राकेश गंगाधर जाधव (वय ४३) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला भेटण्यासाठी वारंवार फोन केला. फिर्यादीने नकार दिला असता आरोपी पाठलाग करत फिर्यादीच्या मुलांच्या शाळांपर्यंत पोहचला. तसेच फिर्याच्या मनात लज्जा उत्पन्न , असे बोलून मानसिक छळ केला. फिर्यादीने आरोपीकडे दुर्लक्ष केले असता फिर्यादीच्या मुलांना आणि आईला जीव मारण्याची धमकी आरोपीने दिले.