दारू पिऊन का आला, असे विचारल्याने वडिलांना मारला कोयता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:24 PM2019-11-04T18:24:33+5:302019-11-04T18:25:50+5:30
मुलाने लोखंडी कोयता कपाळावर मारत आणि घरासमोर पडलेला दगड नाकावर मारून वडिलांना जखमी केले.
पिंपरी :दारु पिऊन का आला, असे वडिलांनी विचारले. त्यामुळे मुलाने लोखंडी कोयता वडिलांच्या कपाळावर मारला. तसेच घरासमोर पडलेला दगड नाकावर मारून जखमी केले. यमुनानगर, निगडी येथे शुक्रवारी (दि. २) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मद्यपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मारुती लक्ष्मण कोळी (वय ४६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास मारुती कोळी (वय २५, रा. यमुनानगर, निगडी), गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मद्यपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी विलास हा शुक्रवारी रात्री मद्यपान करून आला. त्यावेळी त्याचे वडील फियार्दी मारुती यांनी त्याला त्याबाबत जाब विचारला.दारू पिऊन का आला,असे त्यांनी मुलगा विलास याला विचारले. त्यामुळे विलासने त्याच्या जवळ असलेला लोखंडी कोयता वडील मारुती यांच्या कपाळावर मारला. तसेच घरासमोर पडलेला दगड नामावर मारून ज्यांना जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.