चाकूचा धाक दाखवून महिलेला गाडीवर बसवून नेले ; अपहरणाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 17:57 IST2021-01-30T17:55:56+5:302021-01-30T17:57:24+5:30
फिर्यादी यांची इच्छा नसताना देखील वेळोवेळी पाठलाग करून त्यांची बदनामी केली..

चाकूचा धाक दाखवून महिलेला गाडीवर बसवून नेले ; अपहरणाचा गुन्हा दाखल
पिंपरी : चाकूचा धाक दाखवून महिलेला गाडीवर बसवून नेले. तसेच संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने नकार दिला असता तिला गाडीवरून ढकलून देऊन जखमी केले. बदनामी करून महिलेला धमकी दिली. एमआयडीसी भोसरी येथे २१ डिसेंबर २०२० २८ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रामचंद्र नागनाथ कांबळे (वय ३४, रा. दिघी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने चाकुचा धाक दाखवून त्याच्या गाडीवर बसवून नेले. माझ्याशी रिलेशन ठेव, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्याला फिर्यादीने नकार दिला. त्यावेळी आरोपीने नाशिकफाटा येथे फिर्यादीला दुचाकी गाडीवरून ढकलून दिले. यात त्यांना दुखापत होऊन त्या जखमी झाल्या. तसेच फिर्यादी यांची इच्छा नसताना देखील वेळोवेळी पाठलाग करून फिर्यादी यांची बदनामी केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली.