होता तो सराईत गुन्हेगार पण त्याने धुमाकुळ घातला ‘तोतया पोलीस’ म्हणून..  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:32 PM2018-12-26T19:32:45+5:302018-12-26T19:40:18+5:30

पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे असे दरडावत पोलिसाच्या अविर्भावात वावरणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले.

He was a criminal, but he problems created as a ' fake police'. | होता तो सराईत गुन्हेगार पण त्याने धुमाकुळ घातला ‘तोतया पोलीस’ म्हणून..  

होता तो सराईत गुन्हेगार पण त्याने धुमाकुळ घातला ‘तोतया पोलीस’ म्हणून..  

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आवळल्या मुसक्या चाकण तसेच पुणे शहर पोलिसांकडे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलांमध्ये फुकट खायचे,पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावुन मिळेल ती रक्कम घ्यायची.. कोणी विचारलेच तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे. पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे असे दरडावत पोलिसाच्या अविर्भावात वावरणाऱ्या  भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले. चाकण पोलिसांकडे त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडली मिळाली असून राजेंद्र मोहन पाटेकर (रा.भोसरी) असे या तोतया पोलीस अधिकाºयाचे नाव आहे. 
भोसरीतील संत तुकारामनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ राहण्यास असलेल्या राजेंद्र मोहन पाटेकर या आरोपीचे वय ५५ वर्षे आहे. पोलिसांना सोजेसे व्यक्तीमत्व असलेल्या या आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.  पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत चाकण परिसरात हॉटेल व्यवसायिक, पानटपरीचालक,पथारीवाले आणि किराणा दुकानदार यांच्याकडून एकजण पैसे उकळत असल्याची माहिती गुन्हे शखा युनिट एकचे पोलीस हवालदार दिपक खरात, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना याबातची माहिती देण्यात आली. आरोपीचे छायाचित्रही प्राप्त झाले होते. २६ डिसेंबर २०१८ ला बुधवारी तो भोसरीत अंकु श लांडगे सभागृहाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे व पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली असता, त्याच्याविरोधात चाकण तसेच पुणे शहर पोलिसांकडे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन,अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस हवालदार दिपक खरात, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: He was a criminal, but he problems created as a ' fake police'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.