सकारात्मकतेमुळे निरोगी आरोग्य
By Admin | Published: May 12, 2017 05:01 AM2017-05-12T05:01:36+5:302017-05-12T05:01:36+5:30
जेवढे खाल त्याच्या दुप्पट पाणी प्या, तिप्पट चाला, चौपट सकारात्मक राहा म्हणजे आयुष्य पाचपट निरोगी होईल, असा उत्तम सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : जेवढे खाल त्याच्या दुप्पट पाणी प्या, तिप्पट चाला, चौपट सकारात्मक राहा म्हणजे आयुष्य पाचपट निरोगी होईल, असा उत्तम सल्ला देत सदैव गुणग्रहाकतेणे जीवनाच्या विविध पैलूंकडे सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास जीवन सुखी, समाधनी, परिपूर्ण आणि आनंदी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी वाकड येथे केले.
कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचा वतीने तृतीय वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. भंडारी ‘याला जीवन ऐसे नाव..़’ या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. या वेळी नगरसेवक संदीप कस्पटे, नगरसेविका आरती चोंधे, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, फेसकॉमचे महाराष्ट्र सचिव अरुण रोडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, प्रसाद कस्पटे, निखिल कस्पटे आदी उपस्थित होते. प्रसिद्ध गायक तुषार रिठे आणि सहकाऱ्यांचा संगीत आॅर्केस्ट्रा हा बहारदार गाण्याच्या कार्यक्रमाने कार्यक्रमात रंगत आणली.