शहरात जोरदार पाऊस
By admin | Published: June 26, 2017 03:48 AM2017-06-26T03:48:04+5:302017-06-26T03:48:04+5:30
दडी मारलेल्या पावसाने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा होत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दडी मारलेल्या पावसाने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पवना धरणाच्या पाणीपातळीत दोन टक्क्यांनी वाढ झाली.
रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड परिसरासह मावळ परिसरातही रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांनी या पावसाचा आनंद लुटला. तर या पावसामुळे काही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नव्हता. यासह काही मार्गांवर वाहतूककोंडीही झाली होती.
पवना धरणाच्या पाणीपातळीत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी २०.५१ इतकी पाणीपातळी असताना रविवारी सायंकाळी या पातळीत वाढ होऊन २२.४१ टक्क्यांवर पोहोचली. धरणाच्या पाणीपातळीत होत असल्याने शहरवासीयांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवातहोते. मात्र, जून महिना संपत आला, तरी समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाच्या दिवसांतही कडाक्याचे ऊन जाणवत आहे. त्यामुळे सध्या पावसाळा आहे की उन्हाळा असा प्रश्न उपस्थित केला जात होता.