पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ

By विश्वास मोरे | Published: September 2, 2023 10:12 AM2023-09-02T10:12:27+5:302023-09-02T10:18:30+5:30

उशिरा पावसाने सुरुवात होऊन पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २७ ऑगस्टला भरले...

Heavy rain in Pimpri Chinchwad city! Crowd of citizens pune latest news | पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांची तारांबळ

googlenewsNext

पिंपरी: सप्टेंबरची सुरुवात ऑक्टोबर हिटने होत आहे. महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण परिसरामध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. उशिरा पावसाने सुरुवात होऊन पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २७ ऑगस्टला भरले.

त्यानंतर पावसाने ओढ दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. शुक्रवारी कमाल तापमान हे २६ अंश सेल्सिअस वर पोहोचले होते. दिवसभर आणि रात्री कमालीचा उकाडा जाणून आला. पिंपरी चिंचवड शहरात साडेचार सुमारास पावसाला सुरुवात झाली. सकाळी साडेसहा पर्यंत पाऊस कोसळत होता. अधून- मधून ढगांचा गडगडात होत असला तरी, शांतपणे पाऊस कोसळत होता.

अचानक आलेल्या पावसाने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. शहर परिसरातील किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी,  ताथवडे, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, तानाजीनगर, केशवनगर, काळेवाडी, वाकड, पिंपरी, भोसरी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सकाळी वॉकिंगला जाणाऱ्या नागरिकांची झाली.

Web Title: Heavy rain in Pimpri Chinchwad city! Crowd of citizens pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.