Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस

By विश्वास मोरे | Published: July 14, 2024 01:33 PM2024-07-14T13:33:42+5:302024-07-14T13:34:23+5:30

भुशी डॅम, लोणावळा - खंडाळा पर्यटन, मावळ पर्यटन भागात पर्यटकांना बंदी

Heavy rain in Pune district Highest rainfall in Lonavala area is 241 mm | Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस

Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस

पिंपरी: गेल्या २४ तासांपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ मुळशी मधील गिरीवन, तळेगाव दाभाडे, चिंचवड आणि शिवाजीनगरला सर्वाधिक पाऊस झाला आहे. कोरेगाव परिसरात सर्वात कमी पाऊस झाला आहे. 

पिंपरी चिंचवड सह मावळ परिसरामध्ये मावळ, मुळशी परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून पाऊस सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहर तसेच खेड तालुक्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये डोंगरांचा भाग वगळता इतर भागांमध्ये अधून-मधून पाऊस येत आहे तर लोणावळा खंडाळा नगर परिसरात संततधार सुरू आहे. लवळे, दौंड आणि कोरेगाव पार्क या परिसरामध्ये गेल्या २४ तासात कमी पाऊस झाला आहे. 

रात्रभर जोरदार पाऊस!

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड मध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पहिल्या शिफ्ट ला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची, सकाळी शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तरुणांची  गैरसोय झाली. 

भुशी धरणावर बंदी!

भुशी धरणावरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. 

असा झाला २४ तासात पाऊस, मिमी मध्ये

लोणावळा :   241.5
गिरीवन:     141.0
तळेगाव दाभाडे:     59.5
एनडीए:     56.5
खेड :     53.0
पाषाण: 38.5
शिवाजीनगर:     37.0
चिंचवड:     30.0
हडपसर:     27.5
राजगुरुनगर : 25.0
दापोडी:     19.5
बालेवाडी: 17.5

Web Title: Heavy rain in Pune district Highest rainfall in Lonavala area is 241 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.