पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पावसाचा जोर वाढला, आपत्तकालीन व्यवस्थापन सज्ज
By विश्वास मोरे | Published: September 8, 2023 06:08 PM2023-09-08T18:08:17+5:302023-09-08T18:09:58+5:30
मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे...
पिंपरी : पावसाचा जोर वाढला आहे. पवना धरण क्षेत्रात पडणारा पाऊस, पवना धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळीची संभाव्य वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पवना, आंद्रा तसेच वडीवळे धरण क्षेत्र आणि धरणाच्या पुढील भागात होणारे पर्जन्यमान लक्षात घेता, पवना व इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळपर्यंत अजून पाणी पातळीत वाढ होऊ शकते. याबाबत सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.
महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
१) मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष- ०२०- २८३३११११ / ६७३३११११
२) जन.अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी-२७४२३३३३
२७४२२४०५, ९९२२५०१४७५
३) उप अग्निशमन केंद्र, भोसरी, लांडेवाडी भोसरी ८६६९६९२१०१,
९९२२५०१४७६
४) उप अग्निशमन केंद्र, प्राधिकरण- २७६५२०६६, ९९२२५०१४७७
५) उप अग्निशमन केंद्र, रहाटणी- ८६६९६९३१०१, ९९२२५०१४७८
६) उप अग्निशमन केंद्र, तळवडे-२७६९०१०१, ९५५२५२३१०१
७) उप अग्निशमन केंद्र, चिखली- २७४९४८४९, ८६६९६९४१०१
विसर्ग वाढविला-
पवना धरण १०० टक्के भरल्याने सकाळी धरणाच्या वीज निर्मिती गृहाद्वारे आणि धरणाच्या सांडव्यावरून एकूण ५ हजार ६०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीत केला. धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये.
- प्रदीप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त )
पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विदयुत वाहक ठिकाणांच्या संपर्कात येऊ नये तसेच अशा ठिकाणी जनावरे सोडू नये किंवा बांधू नये. औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे.
- चंद्रकांत इंदलकर (सह आयुक्त )