पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:14 PM2019-06-29T13:14:27+5:302019-06-29T13:16:36+5:30
शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पिंपरी चिंचवड : शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी (दि.२८) जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसापुर्वी धरणाच्या पाण्याची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खाली आल्याने पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती . परंतु कालपासुन धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पवनाधरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असुन शनिवारी सकाळच्या आकडेवारीनुसार धरणाची १३.९५% झाले असुन पिण्याच्या पाण्यासाठी सध्यातरी दिलासा मिळाला आहे.
मागील चोवीस तासात पावसाची पवनाधरण परिसरात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दि.१ जून २०१९ पासून ते आज अखेर २६९ मिमी पाऊस झाला आहे. पवनाधरण च्या टक्केवारी १३.९५% झाली असून घसघशीत वाढ झाली.चोवीस तासात ०.८०% ची वाढ झाली आहे.आज अखेर धरणाचा पाणीसाठा १.१९ टीएमसी झाला आहे तर याच दिवशी मागीलवर्षी १.८३ टीएमसी होता, असे पवनाधरण शाखा अभियंता एस.एस.गदवाल यांनी सांगितले आहे.