शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस

By admin | Published: November 13, 2014 11:55 PM2014-11-13T23:55:08+5:302014-11-13T23:55:08+5:30

शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागात गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यामुळे इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

Heavy rains in Shirur drought | शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस

शिरूरच्या दुष्काळी भागात मुसळधार पाऊस

Next
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागात गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यामुळे इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस परिसरातील शेतकरी सुखावला आहे. 
इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस ही गावे कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे. ऐन जानेवारीपासून पुढे पाच महिने या भागातील शेतक:यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
 
4परतीच्या पावसाने इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस या कायम दुष्काळी गावांना ओढ दिली होती. त्यामुळे या परिसरातील शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. मात्र गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसाने येथील प्रामुख्याने कांदा आणि ज्वारी पिकांना या पावसाने फायदा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. 
 
न्हावरे परिसरात मध्यम सरी
4न्हावरे : येथे वादळीवारा व मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने ज्वारीच्या पिकाला काही दिवसापुरते जीवदान मिळाले. दिवसभर वाढलेले तापमान आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेल होती. दरम्यान संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास न्हावरे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. 
4सध्या या परिसरातील ज्वारीचे पीक पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर होते. मात्र पाऊस झाल्याने ज्वारीच्या पिकाला काही दिवसांपुरते जीवदान मिळाले आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्रात कर्नाटक व कोकण किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा या दोन्हीच्या प्रभावामुळे राज्याच्या ढगाळ हवामानात वाड झाली असल्याने राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञाचे म्हणणो आहे. 
4ऊस गळीत हंगामाला या पावसामुळे काही अंशी अडथणा निर्माण झाला आहे. न्हावरे परिसरात तापमानात सरासरीपेक्षा वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. सद्यस्थितीला अशा स्वरूपाचे असणारे हवामान यामुळे या परिसरातील कांदा, गहू, ऊस, हरभरा पिकांसाठी हानिकारक असल्याचे 
शेतक:यांनी सांगितले.

 

Web Title: Heavy rains in Shirur drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.