ताथवडेत इमारतीवरुन उडी घेऊन उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 04:58 PM2017-08-08T16:58:45+5:302017-08-08T16:59:12+5:30

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

High-school marriage suicide by taking a plunge from the building in Tathawade | ताथवडेत इमारतीवरुन उडी घेऊन उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

ताथवडेत इमारतीवरुन उडी घेऊन उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

वाकड, दि. 8 - पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या महिलेचा पाच महिन्यापूर्वी विवाह झाला होता. 
चेतल हेमकर्ण पाटील (वय २५, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चेतलने एमटेकचे शिक्षण घेतले होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी चेतल आणि सासू दोघीच घरात होत्या. दरम्यान, चेतलने सदनिकेत केबल नेटवर्क समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून टेरेसची चावी घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील इतर सदस्य बाहेर आले. त्यावेळी चेतल जखमी अवस्थेत विव्हळत खाली पडली होती. त्यानंतर तिला तात्काळ वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
पाच महिन्यापूर्वी फेब्रुवारीत महिन्यात चेतलचे आयटी अभियंता असलेल्या हेमकर्णशी लग्न झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत. हे कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील आहे. तसेच, पुढील तपासाकामी सदनिका पोलिसांनी सील केली आहे.

Web Title: High-school marriage suicide by taking a plunge from the building in Tathawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.