उच्चशिक्षितांची केली फसवणूक
By admin | Published: April 1, 2017 02:00 AM2017-04-01T02:00:31+5:302017-04-01T02:00:31+5:30
नोकरीवर रुजू होण्यासाठी उच्चशिक्षित तरुण-तरुणींकडून सिक्युरिटी डिपॉझीट म्हणून घेतलेली २२ लाख ९७ हजार रुपयांची
पिंपरी : नोकरीवर रुजू होण्यासाठी उच्चशिक्षित तरुण-तरुणींकडून सिक्युरिटी डिपॉझीट म्हणून घेतलेली २२ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम परत न करता १०८ तरुण-तरुणींची फसवणूक करून कंपनीतील अधिकारी व कर्मचारी पसार झाले. हा प्रकार नुकताच हिंजवडी येथे उघडकीस आला.
याप्रकरणी सिग्नीफिया टेकराईट प्रा.लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पूनम गायकवाड यांच्यासह महेंद्र पाटील आणि आबासाहेब खळदकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संगणक अभियंता नीलेश हासे (वय २५, रा. चिखली, पुणे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केंगार यांनी दिलेली माहिती अशी : आरोपींनी हिंजवडी येथे सिग्नीफिया टेकराईट प्रा.लि. कंपनी सुरू केली होती. कंपनीत काम करण्यासाठी १०८ अभियंता तरुण-तरुणींना नेमले होते. त्यांच्याकडून कंपनीत रुजू होताना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून प्रत्येकी ३० हजार रुपये घेतले होते. १०८ जणांकडून २२ लाख ९७ हजार रुपये घेतले होते.(प्रतिनिधी)